वंजारी कॉलेजमध्ये “डेटा स्ट्रक्चर युझिंग जावा”यावर मार्गदर्शन

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Govindrao Vanjari College गोविंदराव वंजारी इंजिनिअरिंग कॉलेजच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात बी.टेक. सी.एस.ई.च्या द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी “डेटा स्ट्रक्चर युझिंग जावा” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

vir  
 
 
 
या व्याख्यानाचे स्रोत व्यक्ती सॉफ्टबझ टेक. इन्स्टिट्यूशनचे संचालक शरद बनसोड होते. सॉफ्टवेअर डोमेन क्षेत्रातील १५ वर्षांचा अनुभव असलेल्या बनसोड यांनी जावा वापरून डेटा स्ट्रक्चर्सच्या व्यावहारिक अंमलबजावणीवर मार्गदर्शन केले. त्यांनी लिंक्ड लिस्ट, स्टॅक, क्यू व ट्रीज यांसारख्या मूलभूत डेटा स्ट्रक्चर्सचे महत्त्व समजावून सांगत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील त्यांचा प्रत्यक्ष उपयोग विद्यार्थ्यांना दाखवून दिला.Govindrao Vanjari Collegeसी.एस.ई. विभाग प्रमुख प्रा. व्ही. पी. ठाकरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. मनोज वैराळकर यांनी प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण आणि डीन अकॅडेमिक्स डॉ. राकेश श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
सौजन्य:प्रा. मनोज वैराळकर,संपर्क मित्र