मुंबई.
Heart-wrenching video सोशल मीडियावर अनेकदा असे काही क्षण समोर येतात जे पाहणाऱ्याच्या मनाला खोलवर स्पर्श करून जातात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. या व्हिडिओत दाखवले गेलेले दृश्य मुंबईतील बोरिवली रेल्वे स्टेशनवरील आहे, जिथे एक व्यक्ती शांतपणे बसून रडताना दिसत आहे. त्याच्या हातात एक बॅग आहे, डोकं खाली झुकलेलं, आणि डोळ्यांतून वाहणारे अश्रू त्याच्या मनातील वेदना स्पष्ट दाखवतात.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर तिलकदेव दुबे नावाच्या वापरकर्त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्याने लिहिलं, आज मी बोरिवली स्टेशनवर माझ्या ट्रेनची वाट पाहत होतो. काही वेळाने माझ्या शेजारी एक माणूस शांतपणे बसलेला दिसला. त्याचे डोळे पाणावलेले होते, आणि तो शब्द न उच्चारता रडत होता. मी त्याच्याजवळ जाऊन विचारलं, ‘तुम्ही ठीक आहात का?’ त्याने फारसं काही बोललं नाही, फक्त एवढंच म्हणाला, ‘मला काहीतरी आठवलं… विचारल्याबद्दल धन्यवाद.’
तिलकदेवने पुढे लिहिलं की, “मला हा क्षण पोस्ट करायचा नव्हता, कारण तो त्याचा खाजगी क्षण होता, आणि मला त्यावर हक्क नाही. पण जगाने हे पाहायला हवं की पुरुषही भावनांनी भरलेले असतात, तेही रडतात. कदाचित काही दिवसांनी मी हा व्हिडिओ डिलीट करेन. या व्हिडिओला आतापर्यंत ५४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हजारो लोकांनी कमेंट्स करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.