अलर्ट जारी! 'या राज्यांना' सावधतेचा इशारा

देशभर थंडीची लाट

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
मुंबई,
heavy rainfall forecast देशभरात हवामानात अचानक बदल पाहायला मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून जोरदार पावसाची नोंद झाली, तर आता देशाच्या अनेक भागात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. भारतीय हवामान विभागाने नुकतेच थंडीच्या लाटेबाबत मोठा इशारा जारी केला असून, पुढील काही दिवसात थंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.
 
 

heavy rainfall forecast  
राज्यातील वातावरणातही थंडीचे प्रमाण वाढले आहे. पहाटेचे तापमान खाली जाऊ लागले असून, दुपारी उकाडा जाणवत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, 13 नोव्हेंबर रोजी केरळ आणि माहे येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 17 आणि 18 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि रायलसीमामध्ये बहुतेक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल.
देशातील heavy rainfall forecast  काही राज्यांमध्ये 15 नोव्हेंबरपर्यंत थंडीची लाट जाणवेल, तर पश्चिम मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात 13 नोव्हेंबरला थंडीपासून तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेशातील काही भागातही 13 नोव्हेंबरला थंडी वाढेल, तर पुढील पाच दिवसांत ईशान्य भारतात हलके ते मध्यम धुके राहण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील वातावरणही हळूहळू बदलत आहे. धुळ्यात पहाटेचे तापमान केवळ 8 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, तर निफामध्ये तापमान 9 अंशापर्यंत खाली गेला. मालेगाव, परभणी, नाशिक, जेऊर, यवतमाळ आणि गोदिंयामध्ये तापमान 11 अंशांखाली गेले असून, गारठा वाढला आहे. पहाटे गारठा इतका जास्त असल्यामुळे दवदेखील पडत आहे. पुण्यातही गारठा वाढला आहे, तर मुंबईत थंड वाऱ्यासह थंडी जाणवू लागली आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत संपूर्ण देशात थंडीची लाट जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी गरम कपडे, आवश्यक साठा आणि योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा दिवाळीच्या सणातही मुसळधार पावसाचे वातावरण पाहायला मिळाले, ज्यामुळे थंडी आणि पावसाचा अनोखा संगम देशभर अनुभवाला मिळत आहे.