४ ब्रास रेतीसह ३५ लाखांचा मुद्देमाल केला जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
बुलढाणा, 
local-crime-branch-buldhana रेतीची अवैध वाहतूक करणारे टीप्पर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत १३ नोव्हेंबर रोजी पकडले. पथकाने ४ ब्रास रेतीसह ३५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
 
local-crime-branch-buldhana
 
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक (बुलढाणा) अमोल गायकवाड, आणि अपर पोलीस अधीक्षक (खामगाव) श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली, तर पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली. अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान, खबर्‍यांच्या माहितीवरून नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी दिग्रस शिवारात पांढर्‍या रंगाचा टिप्पर येताना दिसला. त्याची पंचासमक्ष तपासणी केली असता, वाहनात सुमारे ४ ब्रास अवैध रेती आढळून आली. चालकाकडे रेती वाहतुकीचा कोण ताही परवाना नसल्याने टिप्पर किंमत ३५ लाख आणि रेती किंमत ४० हजार असा एकूण ३५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. local-crime-branch-buldhana या प्रकरणी टिप्पर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी चालकास अटक करण्यात आली. फिर्यादी म्हणून हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे यांनी तक्रार दाखल केली. कारवाईत पीएसआय अविनाश जायभाये, हे. कॉ. जगदेव टेकाळे, हे.कॉ. दिगंबर कपाटे, पो.ना. अनंता फरतळे, आणि पो.कॉ. दीपक वायाळ यांनी सहभाग घेतला.