जिल्ह्यात तिसर्या दिवशी ओपनिंग, अध्यक्षासाठी १ तर सदस्यासाठी ३ नामांकन
*स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
दिनांक :13-Nov-2025
Total Views |
वर्धा,
local-government-elections जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नामांकन दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी आज गुरुवार १३ रोजी अध्यक्ष पदासाठी १ तर सदस्य पदासाठी ३ नामांकनपत्र दाखल झाले.
जिल्ह्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी व सिंदी रेल्वे या सहा नगर परिषदेच्या अध्यक्ष व सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे. local-government-elections गुरुवारी देवळी नगर परिषदेच्या सदस्य पदासाठी २ तर हिंगणघाट नगर परिषदेच्या सदस्य पदासाठी १ नामांकनपत्र दाखल झाले. तसेच आर्वी नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी १ असे ४ नामांकनपत्र दाखल झाले असल्याची माहिती नगर पालिका प्रशासनाकडून मिळाली आहे.