बळजबरी मोबाईल पळविणार्‍यास अटक

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
man-arrested-for-stealing-mobile-phone बोरगाव मेघे येथील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय तरुणास वाटेत अडवून एका अज्ञात व्यतीने वाद घालून त्याच्या जवळून जबरीने मोबाईल हिसकावून नेला. या प्रकरणी सावंगी पोलिस ठाण्यात तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे हलविली. अवघ्या २४ तासांत त्या अज्ञात व्यतीला अटक करण्यात सावंगी पोलिसांना यश आले. रंजित पारीसे रा. बेघरवस्ती, देवळी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
 

man-arrested-for-stealing-mobile-phone 
 
शिवकुमार आत्राम हा दुचाकीने यवतमाळ येथून वर्धेला येत होता. दुचाकी सेलसुरा भागात आली असता एका अज्ञात व्यतीने त्याला वाटेत अडविले. त्याच्याशी वाद करून मोबाईल हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी शिवकुमार आत्राम याने सावंगी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपासाला सुरूवात केली. तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे रंजित पारीसे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. man-arrested-for-stealing-mobile-phone पोलिसी खाया दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा मोबाईल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विशाल डोणेकर, संजय पंचभाई, निखील फुटाणे, हर्षवर्धन मून, अमोल जाधव, निलीमा गेडाम, अनिल वैद्य यांनी केली.