नागपूर,
MP Festival सध्या सुरू असलेल्या खासदार महोत्सवांतर्गत आयोजित “हरिपाठ आणि पाऊल भजन” या कार्यक्रमात माऊली समूहाने सादर केलेल्या संगीत-नृत्य प्रस्तुतीने रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. भक्ती, नृत्य आणि संगीत यांचा अप्रतिम संगम घडवणाऱ्या या कार्यक्रमाने सभागृहातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय केले.
माधवी नादरखानी आणि प्राजक्ता लोणारे यांनी या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते. त्यांच्या समूहाने अतिशय समर्पक अभिनय, भावपूर्ण नृत्य आणि सुंदर सादरीकरणाद्वारे विठ्ठल भक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला.MP Festival कार्यक्रमाची प्रस्तावना आणि निवेदन आर्या विघ्ने यांनी अत्यंत भावपूर्ण शब्दांत सादर करून कार्यक्रमाला एक आध्यात्मिक प्रारंभ दिला. “गणेश वंदना”, “रखुमाई रखुमाई”, आणि “विठू माऊली” यांसारख्या भक्तिगीतांवर मनोहर नृत्य झाले. प्रत्येक गीताने सभागृहात उपस्थित प्रेक्षकांना भावविभोर केले. उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत, माऊली समूहाच्या कलाकृतीला उत्स्फूर्त दाद दिली.
सौजन्य : जयश्री बोबडे,संपर्क मित्र