मनपाच्या स्तन कर्करोग तपासणी शिबिरांना प्रतिसाद

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
नोव्हेंबर
breast-cancer-screening-camp : महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या मनपा आरोग्य विभागातर्फे एचसीजी कॅन्सर हॉस्पिटल नागपूर आणि रोटरी क्लब नागपूर नॉर्थच्या सहकार्याने महिलांकरिता आयोजित निःशुल्क स्तन कर्करोग तपासणी शिबिरांना महिलांनी प्रतिसाद दर्शविला.
 
 

NMC-tapasani
 
 
 
‘दहा दिवसीय शिबिरात विविध झोनच्या शेकडो महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचे गुरुवारी गांधीबाग झोन येथील महाल लाकडी पूल आयुष्मान केंद्रांवर समापन शिबिराला आमदार प्रवीण दटके यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय तिवारी,एचसीजी रुग्णालयाचे डॉ. सोनम शाहू, डॉ. कमलजीत कौर, यांच्यासह महर्षि कर्वे नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पुढाकाराने व अतिरिक्त आयुक्त पंत यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियाना अंतर्गत मनपाच्या दहाही झोनस्तरावर हे शिबिर आयोजित करण्यात आले. महाल लाकडी पूल आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्रांवर झालेल्या शिबिरात १३१ महिलांनी नोंदणी केली. तर १०३ महिलांची स्तन कर्करोग तपासणी करण्यात आली.