नागपूर,
sant-shree-dnyaneshwar-temple-bajaj-nagar अभ्यंकर नगर नागरिक मंडळ आयोजित संत श्री ज्ञानेश्वर मंदिर, बजाज नगर येथे ‘संत ज्ञानेश्वर दर्शन’ संजीवन समाधी सोहळा दिनांक १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला ७५० वर्षे पूर्ण होत असल्याने या वर्षीच्या सोहळ्याचे विशेष महत्त्व आहे. या त्रिदिवसीय कार्यक्रमांची सुरुवात १५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५.४५ वाजता ह.भ.प. प्रणव शास्त्री पटवारी यांच्या प्रवचनाने होईल.

ते पहिला आणि तिसरा दिवस मराठी तर दुसरा दिवस हिंदी भाषेत असे सलग सलग तीन दिवस प्रवचन देतील. दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मंदिराला भेट देणार असून त्यांच्या उपस्थितीत ‘आधुनिक भिक्षावळ’ उपक्रमाचे उद्घाटन होईल. लहान मुलं संत ज्ञानेश्वर व भावंडांच्या वेशभूषेत हा अनोखा उपक्रम सादर करतील. sant-shree-dnyaneshwar-temple-bajaj-nagar समाजातील दानशूर नागरिकांना आर्थिक योगदानाद्वारे मंदिरांच्या बळकटीसाठी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मंदिर व्यवस्थापनाने केले आहे. १७ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचा सांगता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध स्पर्धांमध्ये विजेते बाल कलाकारांना पुरस्कार वितरण करण्यात येईल. तरी या "ज्ञानेश्वर दर्शन' कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येत नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अशोकराव गुजर, कार्यकारी अध्यक्ष अविनाश संगवई, शिशिर तरासे, विलास देशपांडे आणि नरेंद्र कुलकर्णी यांनी केले आहे.