नागपूर,
ramtek-darshan : सेवादलनगर ज्येष्ठ मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सहलीला ज्येष्ठांनी रामटेक दर्शनाचा लाभ घेऊन आनंद लुटला. सर्वप्रथम भक्तमंडळीनी रामटेक येथील गड मंदिरातील प्रभू श्रीरामाचे तसेच हनुमानाचे दर्शन घेतले. गड मंदिरावरून रामटेक शहराचा विलोभनीय व निसर्गरम्य देखावा बघून सर्व भक्तमंडळीचे मन आनंदाने भरून आले. तिथून थोड्या काही अंतरावर भक्तीधाममध्ये दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी निसर्गाच्या स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतला.
भक्तीधाम या ठिकाणी पूर्णब्रह्म अभियानाबाबतची सविस्तर माहिती पदाधिकारी सुरेश उरकुडे व विठ्ठलराव घोडे यांनी दिली. योगसाधना याबाबतची माहिती संध्या लायस्कर, मधुकर सोनवणे, बाबा जाधव, कोरडे मॅडम यांनी दिली. या सहलीसाठी शहरातील ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान यांनी विनामूल्य बस देऊन सहकार्य केले. प्रतिष्ठानतर्फे डॉ.राजीव मिश्रा (सचिव) यांच्या सहकार्याबाबत मंडळाने त्यांचे आभार मानले. सहल यशस्वी करण्यासाठी सेवादल नगर ज्येष्ठ नागरिक मंडळातील पदाधिकारी नामदेव खाटके, सूरज भानसिंग, प्रवीण सूरकर, छोटू जगनाडे व आदिंचेे सहकार्य लाभले.