सेवासदन शिक्षण संस्थेचे स्नेहसंमेलन

चौफेर शिक्षणाची गरज — रमेश हरडे

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Sevasadan Education Institute सेवासदन शिक्षण संस्थेच्या बालक मंदिर, प्राथमिक शाळा, हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या त्रिदिवसीय संयुक्त स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटक म्हणून वंदना लखानी उपस्थित होत्या.या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी रमेश हरडे म्हणाले, “आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मुले वाचनापासून दूर गेली आहेत. शिक्षकांनी चौकटीतील नव्हे, तर चौफेर शिक्षण देणे गरजेचे आहे.”
 
 
३ ४
 
 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कांचन गडकरी यांनी भूषवले. प्रास्ताविक हर्षा उकेश यांनी केले, तर अहवाल संदीप झाडे यांनी सादर केला. पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. Sevasadan Education Institute विद्यार्थ्यांनी स्व. रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.दर्जेदार शिक्षणाचे माहेर वंदना लखानी पुढे बोलतांना त्या म्हणाल्या , सेवासदन संस्थेने १०० वर्षांचा प्रवास पूर्ण करत दर्जेदार व राष्ट्रीय शिक्षणाची परंपरा जपली आहे, असे मत वंदना लखानी यांनी व्यक्त केले.
 सौजन्य:बाळकृष्ण सुरतने,संपर्क मित्र