यवतमाळ,
free-health-camp : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर रविवार, 9 नोव्हेंबर रोजी सुभाषनगर, प्रजापतीनगर यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा 68 रुग्णांनी लाभ घेतला. शिबिरासाठी हॉस्पिटलतर्फे डॉ. आशीष लडे, मुख्य समन्वयक सुधीर देशपांडे व सहकारी तसेच आरोग्य मित्र अविनाश सांबरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वितेकरिता सौरभ जयस्वाल, गौरव मराठे, निखिल गोडनारे, अक्षय राऊत यांनी परिश्रम घेतले.