संशयीत इसमासह तडीपारास घेतले ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
local-crime-branch : स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकाने वणी येथे केलेल्या कारवाईत गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून असलेल्या संशयीतासह यवतमाळ जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या इसमास ताब्यात घेतले. ही कारवाई 11 नोव्हेंबरच्या रात्री करण्यात आली.
 
 
ytl
 
स्थानिक गुन्हे शाखा पथक वणी परीसरात गस्त करीत असताना एक इसम दीपक चौपाटी परिसरात अंधाराचा फायदा घेऊन गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसल्याची माहिती मिळाली. पथकाने क्षणाचाही विलंब न करता संबंधीत इसमास योग्य त्या बळाचा वापर करून ताब्यात घेतले.
 
 
त्याची विचारपूस केली असता त्याने गोपीकिशन लोणारे (वय 30, सेवानगर वणी) असे नाव सांगितले. त्याच्यावर वणी पोलिस ठाण्यात 122 मपोका प्रमाणे कारवाई करण्यात आली.
 
 
12 नोव्हेंबर रोजी यवतमाळ जिल्हा क्षेत्रातून तडीपार असलेला साहिल कैलास पुरी (वय 22, सेवानगर वणी) हा अपराध करण्याच्या उद्देशाने प्रतिबंधित क्षेत्र नेताजी सुभाषचंद्र चौक वणी येथील देशी दारू दुकानाजवळ फिरत असल्याची माहिती मिळाली.
 
 
वरिष्ठांना या संदर्भात माहिती देऊन पथकातील पोलिस कर्मचाèयांनी त्या ठिकाणी जाऊन शहानिशा केली. संबंधीत इसम साहिल कैलास पुरी असून त्याला ताब्यात घेतले. साहिलला उपविभागीय दंडाधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या आदेशाने 23 जून 2025 पासून यवतमाळ जिल्हा तसेच वणी तालुक्यालगतच्या जिल्ह्यातील तालुकाक्षेत्रातून 6 महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले. साहिल पुरी याला ताब्यात घेत त्याच्यावर वणी ठाण्यात 142 मपोकाप्रमाणे कारवाई करण्यात आली.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, वणी उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सतीष चवरे, सहायक पोलिस निरीक्षक दत्ता पेंडकर, सुधीर पांडे, नीलेश निमकर, सलमान शेख, रजनीकांत मडावी, सतीष फुके यांनी पार पाडली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सुळे करीत आहेत.