चंद्रपूर,
human-wildlife-conflict मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष प्रभावीपणे उपयोगात आणावा. वन्यप्राण्यांचे ‘लोकेशन ट्रेस’ करण्यासाठी ‘ऑनलाईन सिस्टीम’चा वापर करावा. विविध विभागांनी शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या विषयांचा अभ्यास करून सुटसुटीत टिपणी सादर करावी, अशा सूचना अपर मुख्य सचिव तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकसचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी दिल्या.

जिल्ह्यातील पायाभुत कामे आणि प्रमुख प्रकल्पांची सद्यस्थिती तसेच शासनाकडे प्रलंबित असलेल्या उपक्रमांची सोडवणूक करण्यासाठी बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी जिल्हास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतला. human-wildlife-conflict यावेळी ते बोलत होते. नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक रामानुजम, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकाडे तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते रेड्डी म्हणाले, सेवा हमी कायद्याअंतर्गत नागरिकांना ठराविक वेळेत उत्कृष्ट सेवा देणे बंधनकारक आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा प्रशासनाने नियमित आढावा घ्यावा. चंद्रपूर जिल्ह्यात आयुष्यमान भारत कार्ड वाटपासाठी प्रत्येक गाव स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करावे. ग्रीस्टॅक नोंदणी व ई -पीक पाहणी करिता विद्यार्थ्यांची मदत घेता येते का, याची पडताळणी करावी. झुडपी जंगलाबाबत आढावा घेऊन शासनस्तरावरून काय मदत पाहिजे, त्याची माहिती द्यावी. शेतकर्यांच्या उत्पादकतेसाठी महत्त्वपूर्ण असलेली जमिनीची आरोग्यपत्रिका जास्तीत जास्त शेतकर्यांना उपलब्ध करून द्यावी. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणार्या नागरिकांना हक्काचा रोजगार उपलब्ध होईल याबाबत नियोजन करावे. त्यासाठी उद्योगांची कार्यशाळा आयोजित कराव्यात, अशा सुचना रेड्डी यांनी केल्या.