लाल किल्ला स्फोट प्रकरण : उमर नबीचा दिल्लीतील रहस्य उघडले

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Delhi blast investigation लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासात मोठे धक्कादायक खुलासे उघड झाले आहे. या स्फोटाचा मुख्य सुत्रधार मानला जाणारा दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद उर्फ उमर नबी स्फोट करण्यापूर्वी पुरानी दिल्लीतील फैज़-ए-इलाही मशिदीत गेला होता, अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही मशीद रामलीला मैदानाच्या कोपऱ्यावर तुर्कमान गेटसमोर स्थित असून तब्लीगी जमातशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.
 
 
Delhi blast investigation
 
सीसीटीव्ही फुटेजमध्ये Delhi blast investigation उमर मशिदीत प्रवेश करताना आणि दहा मिनिटांहून अधिक वेळानंतर बाहेर पडताना स्पष्ट दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावरून उमरने स्फोटापूर्वी तेथे कोणाशी तरी संपर्क साधला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.तपास संस्थांनी उमरचा फरीदाबाद ते दिल्ली असा संपूर्ण प्रवासमार्ग शोधून काढला आहे. स्फोटानंतर तो फरीदाबादहून मेवातमार्गे फिरोजपूर झिरका येथे पोहोचला होता. त्यानंतर दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरून तो परत दिल्लीकडे निघाला. मार्गात त्याने एका ढाब्यावर थांबून रात्र कारमध्येच घालवली. या प्रवासादरम्यान एक्सप्रेसवेवरील अनेक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये त्याच्या इको स्पोर्ट्स कारच्या हालचाली कैद झाल्या आहेत.
 
 
 
कारमध्ये स्फोटक
 
 
फरीदाबादमध्ये Delhi blast investigation ही संशयास्पद कार सापडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. कारमध्ये स्फोटक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने ती अद्याप सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आली आहे. एनएसजीचे पथक आणि केंद्रीय सुरक्षा संस्था घटनास्थळी उपस्थित असून वाहनाची तपासणी सुरू आहे. एनएसजीकडून क्लिअरन्स मिळेपर्यंत कार स्थानिक पोलिसांना किंवा इतर कोणत्याही संस्थेला सुपूर्द केली जाणार नाही.तपासात आणखी एक महत्वाचे सूत्र पुढे आले आहे. उमर आणि त्याचे काही साथीदार ‘UKasa’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका हँडलरच्या संपर्कात होते. हा कोडनेम असावा आणि खरी ओळख लपवण्यासाठी त्याचा वापर झाला असावा, असा तपास अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. हा हँडलर सेशन अॅपच्या माध्यमातून दहशतवाद्यांशी संवाद साधत होता, आणि त्याचे लोकेशन तुर्कीची राजधानी अंकारा येथे असल्याचे आढळले आहे.सूत्रांनुसार, मार्च 2022 मध्ये भारतातून काही व्यक्ती अंकारा येथे गेल्या होत्या आणि तिथेच त्यांचा ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी कारवायांत सहभागी केले गेले असावे, असा संशय आहे.या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयए, एनएसजी आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखा संयुक्तपणे करत आहेत. तपास यंत्रणा उमर नबीच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची पडताळणी करत असून, या स्फोटामागील आंतरराष्ट्रीय कटाचा धागा शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.