वर्षा सांगडे राज्य समिती सदस्यपदी

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव, 
varsha-sangde : सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे चौथे राज्य अधिवेशन परळी (वैजनाथ) येथे 8 व 9 नोव्हेंबरला प्रवचन मंडपात उत्साहात पार पडले. यात वर्षा सांगडे यांची राज्य समिती सदस्यपदी निवड करण्यात आली.
 
 
y13Nov-Varsha-Sangade
 
यावेळी परळी शहरात भव्य रॅली काढण्यात आली. उद्घाटन राष्ट्रीय महासचिव मधुमिता बंडोपाध्याय यांच्याहस्ते झाले. अधिवेशनाला राज्यभरातून निवडक प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनाला सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष डीएल कराड आणि राज्य महासचिव अ‍ॅड. एमएच शेख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
 
 
मंचावर आनंदी अवघडे, पुष्पा पाटील, शुभा शमीम, इराणी, प्राची हतीवलेकर, उज्ज्वला पडलवार, डॉ. अशोक थोरात, प्रभाकर नागरगोजे आणि मंगल ठोंबरे उपस्थित होते. या अधिवेशनात आनंदी अवघडे यांची अध्यक्षपदी, पुष्पा पाटील यांची राज्य महासचिवपदी, अर्चना घुगरे यांची खजिनदारपदी, शीला ठाकूर राज्य उपाध्यक्षपदी, तर वर्षा सांगडे यांची राज्य समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. सीटू जिल्हा समितीतर्फे नव्याने निवड झालेल्या राज्य समिती सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.