पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले

अनैतिक संबंधाची किनार

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
अमरावती, 
wife-killed-husband-with-help-of-lover बडनेरा हद्दीतील भानखेडा रोडजवळ जंगलात आढळलेल्या अज्ञात व्यक्तीच्या हत्येचे गूढ अवघ्या आठ तासात उलगडण्यात अमरावती शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. अनैतिक संबंधांच्या आड येणार्‍या पतीची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने कट रचून निर्घृण हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.
 
 
wife-killed-husband-with-help-of-lover
 
प्रमोद बकाराम भलावी (४२, रा. कारला, हल्लीमुक्काम रा. अंजनगावबारी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रमोदची पत्नी छाया आणि तिचा प्रियकर विश्वांबर दिगांबर मांजरे (३९, रा. विश्वी, जि. बुलडाणा) या दोघांना अटक केली आहे. माहितीनुसार, बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हनुमान गढी ते भानखेडा रोडवरील जंगलात एका युवकाचा मृतदेह आढळला होता. डोक्यात दगड टाकून चेहरा विद्रूप केल्यामुळे त्याची ओळख पटवणे कठीण होते. घटनास्थळी पोलिसांना एक मोटारसायकल आढळली. हाच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला. wife-killed-husband-with-help-of-lover ही मोटारसायकल टवलार ता. अचलपूर येथील एका व्यक्तीच्या नावे असली तरी, ती काही दिवसांपूर्वीच प्रमोद भलावी याला विकल्याची माहिती मिळाली. तो दिवाळीपासून अंजनगावबारी येथे पत्नी छायासोबत राहत असल्याचे समजले.
 
पत्नीची उडवाउडवीची उत्तरे
पोलिस पथकाने पत्नी छायाकडे चौकशी केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्याने संशय बळावला. तपासात छायाचे विश्वांबर मांजरे नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेचे पथक तातडीने बुलडाणा जिल्ह्यातील विश्वी गावी रवाना झाले व गुरुवारी विश्वांबरला ताब्यात घेतले. तो राजकाम करतो. डिसेंबर २०२४ मध्ये छायाच्या घराचे काम करत असताना त्यांची ओळख झाली होती. दिवाळीत पती प्रमोद याला या संबंधाची कुणकुण लागल्याने दोघांनी मिळून त्याचा काटा काढण्याचा कट रचला.
हत्येची दिली कबुली
पोलिसांनी विश्वांबरची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सोमवारी रात्रीच दोघांनी प्रमोदला घटनास्थळी नेले. तेथे लघुशंका करण्याच्या बहाण्याने थांबवून आधी कोयत्याने वार केले व नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दगडाने ठेचून त्याची हत्या केली. पोलिसांनी घटनास्थळावर लपवून ठेवलेला कोयता जप्त केला आहे. wife-killed-husband-with-help-of-lover ही कामगिरी पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण इम्रान नायकवडे, अनिकेत कासार यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.