आरोग्य जनजागृती उपक्रमांना गती देण्यासाठी आढावा बैठक

    दिनांक :13-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
yavatmal-news : राज्यातील विविध आरोग्य कार्यक्रम आणि योजनांचा प्रभावी प्रसार करून त्या अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्या अध्यक्षतेत राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला राज्यातील सर्व जिल्ह्यांतील विस्तार व माध्यम अधिकारी उपस्थित होते.
 
 
 
y13Nov-Aadhava
 
 
 
 
राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक डॉ. कैलास बावीस्कर, डॉ. भगवान पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे, तसेच सहायक संचालक डॉ. संजयकुमार जठार बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज्यातील आरोग्य जनजागृती उपक्रम, जनसंपर्क मोहिमा, तसेच माध्यमांशी प्रभावी संवाद यावर सविस्तर चर्चा झाली.
संचालक डॉ. कंदेवाड यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजना आणि उपक्रम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी नावीन्यपूर्ण माध्यम धोरण आखण्याची सूचना केली. त्यांनी सांगितले की, आरोग्य विषयक माहिती जनसामान्यांना सुलभ भाषेत आणि आकर्षक पद्धतीने दिली गेल्यास त्यांचा आरोग्य विषयक जागरूकतेत मोठी भर पडेल.
प्रसारमाध्यमांशी सकारात्मक आणि सातत्यपूर्ण संपर्क राखणे, तसेच आरोग्याशी संबंधित नकारात्मक किंवा गैरसमज निर्माण करणाèया बातम्यांना योग्य प्रत्युत्तर देऊन तथ्य मांडणे, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व जिल्हा माध्यम अधिकाèयांना समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना दिल्या. विभागाच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांवरील फॉलोअर्स वाढविण्यासाठी समन्वयित प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
आरोग्य जनजागृती हा केवळ विभागाचा कार्यक्रम नसून तो एक सामाजिक जबाबदारीचा भाग आहे. प्रत्येक अधिकाèयाने त्यासाठी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे, अशी अपेक्षा बैठीकीचा समारोप करताना डॉ. बाविस्कर यांनी व्यक्त केली.
या बैठकीत जिल्हा स्तरावर राबविल्या जाणाèया आरोग्यविषयक जनजागृती उपक्रमांचे अनुभव, अडचणी व यशोगाथा यांची देवाणघेवाण करण्यात आली. जनतेत आरोग्यविषयक जागरूकता वाढवण्यासाठी सर्व स्तरांवर माहिती-प्रसार मोहिमा अधिक सशक्त करण्यावर भर देण्यात आला.