अल्लीपूर,
khanjiri-bhajan-competition : स्थानिक गुरुदेव सेवा मंडळ व परिवर्तन युवा मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय खंजरी भजन स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार १३ रोजी रात्री झाले. राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे हे सलग तेरावे वर्ष आहे.
राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा उद्घाटनकृष्णाजी पाहुणे यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी तुकाराम घोडे महाराज होते. माजी सरपंच प्रभाकर फटींग, तंटामुती समितीचे माजी अध्यक्ष धनराज सुपारे, ग्रापंचे माजी सदस्य श्रीराम साखरकर, प्राचार्य अर्चना मुडे, माजी सरपंच मंदा पारसडे, ग्रापंच्या माजी सदस्य सविता साखरकर डॉ. विजय खोंड, आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
स्पर्धेच्या उद्घाटनानंतर तुकाराम घोडे महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. घोडे महाराजांनी सर्व जाती, धर्माच्या लोकांनी एकत्र राहावे. युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. त्याला घडवण्याचे काम नवीन युवकांनी करावे व त्यांनी चांगला मार्ग स्वीकारावा तरच आपण या देशाचा उद्धार करू शकतो. भाऊ भावाचा वैरी होत आहे समाज दिशाहीन होत आहे त्याला दिशा देण्याचे काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार करीत आहे. गावातील लोकांनी एकत्र येऊन चांगले काम करावे असे घोडे महाराज म्हणाले.
प्रास्ताविक कैलास बाळबुधे यांनी केले. संचालन परेश सावरकर यांनी केले व आभार प्रदर्शन संदीप नरड यांनी केले.