दर्यापुरात भाजपा व राष्ट्रवादीची युती

नगर परिषद निवडणूक

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
दर्यापूर, 
bjp-and-ncp-alliance : दर्यापूर नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत युतीची घोषणा केल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शुक्रवारी सकाळी ढोकणे भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करण्यात आली.
 
 
kl;
 
भाजपा व अ. प. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झालेल्या युतीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा भाजपाकडे राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. २५ नगरसेवकांच्या जागा वरिष्ठ स्तरावरील बोलणीनंतर ठरवण्यात येणार आहेत. युतीचा फार्म्यूला कसा असेल याबाबत स्पष्टता देण्यात आली नसली तरीही ७५ -२५ असा राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दर्यापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असून भाजपा ही स्वबळावरच निवडणूक लढवेल असे जाहीर करण्यात आले होते; मात्र वरिष्ठांकडून आलेल्या सूचनेनुसार दर्यापुरात भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने युती करीत महायुतीची घोषणा केली आहे. शिवसेना शिंदे गटही या युतीमध्ये सामील होणार का, याबाबत दोन्ही पक्षांनी मौन बाळगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जुन्या दर्यापुरात बर्‍यापैकी प्राबल्य आहे. याचा फायदा भाजपाला होऊ शकतो. या युतीमुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे दिसत आहे.
 
 
पत्रकार परिषदेला भाजपाचे बाबाराव बरवट, मदन बायस्कर, मेघा भारती, अनिल कुंडलवाल, भरत शुक्ला, विजय मेंढे, माणिक मानकर, रोशन कट्यारमल, दीपक पारोदे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोलसिंह गहरवार, सुनील मोपारी यांच्यासह भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.