अमृत भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन वेळा धावणार

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
नागपूर,
amrut-bharat-express नागपूर मार्गे धावणारी ट्रेन १९०२१/१९०२२ उधना-ब्रह्मपूर-उधना अमृत भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन वेळा धावणार आहे. रेल्वे बोर्डाने तशा प्रकारची मान्यता दिल्याचे प्रशासनाने कळविले आहे. त्यानुसार ही ट्रेन उधना येथून रविवार, बुधवार आणि शुक्रवारी धावणार असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
amrut-bharat-express
 
त्यानुसार, amrut-bharat-express ट्रेन नंबर १९०२१ उधना- ब्रम्हपूर भारत एक्स्प्रेस सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री ७.२५ वाजता नागपूरला आहे, तर ट्रेन नंबर १९०२२ ब्रम्हपूर-उधना मंगळवारी, शुक्रवारी, रविवारी रात्री ८ वाजता नागपुरात पोहोचणार आहे.