नागपूर,
blocking-flow-of-water-resources शहरातील नैसर्गिक जलस्रोतांमध्ये प्रदूषण करणार्यांची आता खैर नाही. नागपूर महापालिकेकडून अशाप्रकारे जलस्रोतांचा प्रवाह आता एक लाखाचा दंड आकारण्यात येणार आहे. जल व वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेकडून याप्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

नागरिकांकडून शहरातील नैसर्गिक जलस्रोतांमध्ये बांधकाम व पाडकामाचा कचरा, उरलेले अन्न टाकण्यात येते. त्यामुळे पाण्याचा प्रवाह रोखला जाऊन जलस्रोत प्रदूषित होतात. इतकेच नव्हे तर जुनी इमारत तोडताना धूर उडवून वायुप्रदूषण करण्यात त्याचबरोबर कचरा, मलबा, रेती, गिट्टी व कचर्याची वाहतूक करताना आवश्यक ती काळजी घेण्यात येत नाही. तर हॉटेलमध्ये चेंबर नसल्याने परिसरात सर्वत्र घाण पसरते व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. महापालिकेने आता सर्व प्रकारांची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशांनंतर उपद्रवांच्या प्रकारांमध्ये जल व नियंत्रण मिळवण्यासाठी नऊ नवीन उपद्रव समाविष्ट करण्यात आले आहेत. blocking-flow-of-water-resources शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकास कार्य केले जात आहे. असे असताना शहरातील प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवीन उपद्रवांच्या यादीत जल व वायुप्रदूषण करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, या संदर्भातील आदेश घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांनी जारी केले आहेत.
कचरा, मलबा, रेती, गिट्टी व कचर्याची वाहतूक करीत असताना त्या गाडीवर तरपाल न टाकणे व प्रदूषण निर्माण करणार्यांकडून आता दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल. याशिवाय, हॉटेलमध्ये डिसेल्टिंग चेंबर नसेल, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण कचरा शुल्क न भरणे व कचरा अन्य ठिकाणी फेकणार्यावर आता पहिल्यांदा पाच हजार रुपयांचा वसूल केला जाणार आहे. त्यानंतर दुसर्या गुन्ह्यासाठी १० हजार व तिसर्यांदा करणार्यांकडून आता २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. लग्न समारंभाचे हॉल, सभागृह, कॅटरिंग व हॉटेल व्यवसायिक यांनी उरलेले अन्न सार्वजनिक ठिकाणी आता प्रथमतः १० हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल.