नागपूर,
Hawarapeth हावरापेठ येथील रवींद्र गोडे यांच्या निवासस्थानी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा १५ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक उपक्रमांनी होत आहे. या तीन दिवसांच्या सोहळ्यात भजनी मंडळांचे भजन, काकड आरती, सामूहिक ध्यान, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन आणि हरिपाठ यांचे आयोजन करण्यात आले आहे.
१७ नोव्हेंबर रोजी पहाटे काकड आरतीचे सादरीकरण हावरापेठ काकड आरती मंडळ आणि साईबाबा महिला भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. Hawarapeth त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त रामधून दिंडी काढून हावरापेठ परिसराला प्रदक्षिणा देण्यात येईल. दुपारी भजनी, गोपालकाला हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. गोपालकाला आरती आणि प्रसादाने संजीवन समाधी सोहळ्याचा समारोप होईल. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गोडे परिवार व मित्र परिवार परिश्रम घेत आहेत.
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र