nagpur-railway-station रेल्वेत विनातिकीट प्रवास करणार्या फुकट्या प्रवाशांवर’ कारवाई करत एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत मध्य रेल्वेने १४१ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. प्रवाशांना चांगला आणि आरामदायी प्रवास देण्यासाठी भारतीय रेल्वे विविध रेल्वे विभागांत अनधिकृत आणि फुकट्या प्रवाशांना आळा प्रयत्न करत आहे.
यात आता मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतील डेटा जारी केला आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या विविध तिकीट तपासणी पथकांनी २३ लाख ७६ हजार फुकट्या प्रवाशांना अवैध प्रवास करताना पकडले आहे. nagpur-railway-station त्यांच्याकडून तब्बल १४१ कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फुकट्या प्रवाशांमध्ये टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवासासाठी तिकीट तपासणी मोहीम नियमितपणे राबविण्यात येते.