महामार्गावरील धुळीच्या वावटळीने वाई गौळ ग्रामस्थ त्रस्त

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
मानोरा, 
In a whirlwind of dust तीर्थक्षेत्र वाई गौळ या गावाच्या मध्यभागातून निर्माणाधीन असलेल्या महामार्गावरील धुळीच्या लोटाने या गावातील नागरिकांसह भक्तमंडळी व स्थानिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, स्थानिकासह बाहेरच्या नागरिकांना सुद्धा धुळीच्या बारीक कणामुळे विवीध आजाराला सामोरे जावे लागत असल्याने यावर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. अकोला आर्णी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए चे निर्माण राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण द्वारा मानोरा तालुयातून करण्यात येत असून, हा महामार्ग तीर्थक्षेत्र (अमरगड) वाई गौळ येथे मागील पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून विविध कारणांनी रखडलेला आहे. वाई गौळ या गावाच्या मध्यभागातील या पूर्वीच्या डांबरीकरणाच्या रस्त्याला खोदून जवळपास पाच वर्षे झालेली आहेत. खोदण्यात आलेल्या महामार्गावरील माती प्रत्येक वाहन ज्यावेळी येथून येजा करते त्यावेळी मोठ्या प्रमाणात मातीचे वावटळ उठून महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या घरांमध्ये, दुकानांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात त्रास यामुळे वर्षानुवर्षी नागरिक सहन करीत आहेत.
 
 

In a whirlwind of dust 
 
स्थानिक तपस्वी काशिनाथ महाराज प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये येजा करणारे विद्यार्थी तथा देवस्थानाला येणार्‍या भाविक भक्तांसह या गावातून दुचाकी, ऑटो द्वारा प्रवास करणार्‍या नागरिकांच्या नाकातोंडात व डोळ्यात मातीसह मातीचे बारीक जात असल्याने फुफ्फुसाच्या आजारासह, अस्थमा, त्वचेची एलर्जी, श्वसनाचे व डोळ्याच्या आजारांना नागरिक बळी पडत आहेत. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाद्वारा नेमण्यात आलेल्या कंत्राटदार कंपनीने यथा शीघ्र रस्त्याची निर्मिती करावी वा जोपर्यंत रस्ता निर्मिती होत नाही तोपर्यंत मातीच्या कणाचे वावटळ उठू नये यासाठी जास्तीत जास्त वेळा किमान दिवसाआड तरी या खोदलेल्या रस्त्यावर पाणी शिंपडण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
छायचित्र - महामार्गावरील धुळीचे वादळ