अमृत योजनेचे तिकीट नाकारून ज्येष्ठ नागरिकास अपमानास्पद वागणूक

एसटी वाहकावर कार्यवाहीची मागणी

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
insulting treatment to senior citizen : एसटी महामंडळाची ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत योजनेत सवलतीचे तिकीट असून आणि संबंधित व्यक्ती पात्र असतानाही त्यांना ते नाकारून अपमानास्पद वागणूक वाहकाने दिली. त्यासंबंधी संबंधित आगार व्यवस्थापकाकडे तक्रार केली असून न्यायाची मागणी केली आहे.
 
 
 
st
 
 
दारव्ह्यातील ज्येष्ठ नागरिक आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राध्यापक राजेंद्र ठाकूर त्यांच्या पत्नीसोबत ऑक्टोबर महिन्यात दारव्हा ते यवतमाळला गेले होते. त्यांना त्यावेळेस वाहकाने सवलतीचे तिकीट दिले. परंतु त्याच दिवशी यवतमाळ ते दारव्हा परत येत असताना एसटी बस क्रमांक एमएचएलएक्स 8941 (नागपूर डेपो, नागपूर-नांदेड बस) वाहकाचे नाव डब्ल्यूवाय ढाकणे, बी. क्र. 2919 या बसमध्ये राजेंद्र ठाकूर आणि त्यांच्या पत्नी प्रवास करताना संबंधित वाहकास आधारकार्ड दाखवूनसुद्धा अमृत योजनेची तिकीट नाकारली.
 
 
ठाकूर हे ज्येष्ठ नागरिक असताना त्यांना संबंधित वाहकाने विनाकारण वाद घालून अपमानित केले. त्याच आधारकार्डवर 1 महिला व 1 ज्येष्ठ नागरिक म्हणून 82 रुपयांचे तिकीट दिले. वास्तविक, ज्येष्ठ नागरिकास शासन अनेक सवलती व सन्मान देत आहे. अमृत योजनेचा लाभ शासन देत आहे. तसेच संबंधित दोन्ही बसेस नागपूर डेपोच्या असतानासुद्धा एक बस योजना राबवते, तर त्याच डेपोची दुसरी बस लाभ किंवा ती योजना नाकारते.
 
 
त्यामुळे शासनाच्या सन्मान योजनेपासून राजेंद्र ठाकूर यांना वंचित केले आहे. यासंबंधी ठाकूर यांनी संबंधीत वाहकाची लेखी तक्रार आगार व्यवस्थापकडे संपूर्ण कागदपत्रासह केली असून न्यायाची मागणी केली आहे. जर यासंबंधी आगार व्यवस्थापकाने कार्यवाही केली नाही तर ठाकूर महामंडळाच्या विरोधात प्रकरण ग्राहक न्यायालयात दाखल करणार आहे. या तक्रारीच्या प्रतिलिपी संबंधीत विभागाच्या वरिष्ठांना तसेच परिवहन मंत्री व इतर प्रमुख अधिकाèयांना दिल्या आहेत.