तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
municipal-council-nagar-panchayat-elections : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी 4 नोव्हेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषद यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड, दिग्रस, पांढरकवडा, दारव्हा, घाटंजी, नेर-नवाबपूर, आर्णी तसेच नगरपंचायत ढाणकी यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
या पृष्ठभूमिवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे घेण्यात आली. बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशन दाखल करणे, नामनिर्देशन मागे घेणे, मतदान व निकालाच्या तारखा, तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच नप अध्यक्ष व सदस्यपदाच्या उमेदवारांसाठी लागू असलेल्या निवडणूक खर्च मर्यादेबाबत माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुख्य निवडणूक निरीक्षक, सहायक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक व अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांची नावे, कार्यक्षेत्र व संपर्क तपशील खालीलप्रमाणे आहेत.
मुख्य निवडणूक निरीक्षक मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ दुरध्वनी क्रमांक 9422250465. निवडणूक निरीक्षक : अनिल खंडागळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी, यवतमाळ दूरध्वनी क्रमांक 9657350644 कार्यक्षेत्र नगरपरिषद यवतमाळ, नगरपरिषद पांढरकवडा.
संतोष धोत्रे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ दूरध्वनी क्रमांक 9421060248 कार्यक्षेत्र नगरपरिषद वणी, घाटंजी, आर्णी. सुदर्शन गायकवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो), यवतमाळ दूरध्वनी क्रमांक 9923049253 कार्यक्षेत्र नगरपरिषद पुसद, उमरखेड, नगरपंचायत ढाणकी. जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, दूरध्वनी क्रमांक 9405324749 कार्यक्षेत्र नगरपरिषद पुसद, दारव्हा, नेर-नबाबपूर.
निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
यवतमाळसाठी उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, दूरध्वनी क्रमांक. 9096394139, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, दूरध्वनी क्रमांक 9511894512. तहसीलदार योगेश देशमुख दूरध्वनी क्रमांक 9890566240. पुसदसाठी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल दूरध्वनी क्रमांक 9423123868, पुसद तहसीलदार महादेव जोरबर दूरध्वनी क्रमांक 8605884233/9423525102. नगरपरिषद पुसद मुख्याधिकारी अतुल पंत दूरध्वनी 9096688958.
वणीसाठी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले दूरध्वनी 9404805317, वणी मुख्याधिकारी सचिन गाडे दूरध्वनी 8424838329. उमरखेडसाठी उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे दूरध्वनी 75888435085, नप मुख्याधिकारी अजय कुरवाडे दूरध्वनी 7719922700, दिग्रससाठी उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी दूरध्वनी 8983635387, तहसीलदार मयूर राऊत दूरध्वनी 8793567318, मुख्याधिकारी गिरीष पारेकर दूरध्वनी 8208849104. पांढरकवडासाठी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अमित रंजन दूरध्वनी 9410391710, नप मुख्याधिकारी शशिकांत बाबर दूरध्वनी 9130620834, तहसीलदार राजेंद्र इंगळे दूरध्वनी 9860822474.
दारव्हासाठी तहसीलदार रवी काळे, दूरध्वनी 9145545419. नप मुख्याधिकारी विठ्ठल केदारे दूरध्वनी 8275009400, घाटंजीसाठी राळेगाव उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील दूरध्वनी 9975462219, नप मुख्याधिकारी राजू घोडके दूरध्वनी 9890399450, तहसीलदार विजय साळवे, दूरध्वनी 8275399586. नेरसाठी तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी दूरध्वनी 9823919134, बाभुळगाव नपं मुख्याधिकारी पल्लवी सोटे दूरध्वनी 7972047110, नेर नपं मुख्याधिकारी येमाजी धुमाळ दूरध्वनी 9423249956. आर्णीसाठी तहसीलदार वैशाख वाहूरवाघ दूरध्वनी 9689051704, मुख्याधिकारी रवींद्र राऊत दूरध्वनी 9423432383.
ढाणकीसाठी उमरखेड तहसीलदार राजू सुरडकर दूरध्वनी 8805453421, मुख्याधिकारी अरुण मोकळे दूरध्वनी 9284517792. या अधिकाèयांची नेमणूक करण्यात आली आहे.