सण आणि उत्सवादरम्यान सायबर गुन्हेगारांची झाली ‘चांदी’

- दसरा-दिवाळीत वाढले फसवणुकीचे गुन्हे - नागपूरकरांना 10 महिन्यांत 40 काेटींना गंडविले

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
cyber-crime : सणाेत्सवाच्या काळात सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला असून शेकडाे नागरिकांना सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकवून काेट्यवधीने गंडा घातला आहे. दसरा ते दिवाळी या कालावधीत ‘ऑफर किंवा सूट’ या गाेंडस नावावर सायबर गुन्हेगारांना महिला, वृद्धांसह महाविद्यालयीन तरुण-तरुणींनाही गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. उपराजधानीत सायबर गुन्हेगारांनी 40 काेटीं रुपयांनी फसवणूक केली असून त्यापैकी 11 काेटी रुपये पाेलिसांनी सायबर गुन्हेगारांच्या घशातून बाहेर काढले आहेत.
 

cyber 
 
 
गेल्या काही वर्षांत माेठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. िफनटेक व ई काॅमर्स या क्षेत्रात सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. सायबर गुन्ह्यात माेठी वाढ झाल्याने ग्राहकांना सातत्याने फसवणुकीला सामाेरे जावे लागत आहे. विशेष करुन काेणत्याही सण-उत्सवादरम्यान सायबर गुन्हेगार ईलेक्ट्राॅनिक्स वस्तू, घरगुती वापराच्या वस्तू किंवा महागड्या ब्रँडचे कपडे यावर माेठी सूट किंवा ऑफर असल्याचे सांगून सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळ्यात ओढत असतात. सणासुदीच्या काळात ई काॅमर्स व्यवहारात (ऑनलाईन ट्रान्झेक्शन) माेठी वाढ हाेत असते. सणासुदीच्या दिवसांत सायबर गुन्हेगार माेठमाेठ्या नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट वेबसाईट्स तयार करतात.
 
 
तसेच बनावट शाॅपींग अ‍ॅप्स तयार करुन त्याच्या लिंक वेगवेगळ्या व्हाॅट्सअप ग्रूपमध्ये पसरविल्या जातात. अनेक संकेतस्थळावर एका काेपèयात ऑफरच्या नावाने लाेगाे तयार करण्यात येते. अशा विविध आमिषाला महिला, तरुणी आणि वृद्ध हमखास बळी पडतात. ऑफर किंवा सूट मिळविण्यासाठी संकेतस्थळावर किंवा अ‍ॅप्समध्ये माहिती भरण्यास भाग पाडतात. त्यातून अनेक ग्राहकांना लुबाडण्यात येते. नागपुरात जानेवारी ते 11 नाेव्हेंबरपर्यंत सायबर गुन्हेगारांनी शेकडाे नागरिकांना गंडा घालून 40 काेटींची लुबाडणूक केली. सायबर पाेलिसांनी सायबर गुन्हेगारांच्या तावडीतून 11 काेटी रुपयांची साेडवणूक करुन नागरिकांना परत केले. तर आतापर्यंत दाखल गुन्ह्यातील 12 काेटी रुपये पाेलिसांनी विविध बँक खात्यात गाेठवून ठेवले आहेत, अशी माहिती सायबर पाेलिसांनी दिली.
 
 
लिंक पाठवून सर्वाधिक फसवणूक
 
 
गेल्या दहा महिन्यात नागपुरातील शेकडाे ग्राहकांची सायबर गुन्हेगारांनी लिंक पाठवून फसवणूक केली. मात्र, सणासुदीच्या दिवसात 97 लाखांची फसवणूक सायबर गुन्हेगारांनी केली. आतापर्यंत 7 गुन्ह्यांचा तपास पाेलिस करीत आहेत. ऑफरच्या माध्यमातून थाेडेार पैसे वाचविण्यासाठी ग्राहक आपल्या खात्यातील सर्व रक्कम गमावत आहेत. लिंकच्या माध्यमातून सर्वाधिक फसवणूक करण्यात आली असून अनेक जण लिंकवर क्लिक करुन जाळ्यात अडकत असल्याची माहिती समाेर आली आहे.
 
 
महिला व ज्येष्ठ टार्गेटवर
 
सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदीमध्ये वाढ हाेते, त्यामुळे सायबर गुन्हेगार सर्वाधिक महिला व वृद्धांना टार्गेट करतात. ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात सर्वाधिक महिला-तरुणी असल्याची माहिती समाेर आली आहे. ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर अनेक जण संबंधित कंपनीचा कस्टमर केअर क्रमांक गुगलवरुन शाेधून त्यावर ाेन करतात. सायबर गुन्हेगार असे काॅलवरुनही आर्थिक फसवणूक करतात.
 
 
ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांनी सजग राहावे. ऑफर आणि सूट अशा काेणत्याही आमिषाला बळी पडू नका. ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना फसवणूक झाल्यास लगेच सायबर पाेलिस ठाण्यात तक्रार करा.
- बळीराम सुतार (वरिष्ठ पाेलिस निरीक्षक, सायबर पाेलिस स्टेशन)