अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-vanbala : बालाेद्यानाच्या साैंदर्यीकरणानंतर सेमिनरी हिल्सच्या हिरवळीची सफर घडविणारी वनबाला बंद आहे. सेमिनरी हिल्समधील हा प्रवास गेल्या काही दिवसांपासून वन विभागाच्या लालिफतशाहीत अडकला असल्याचे लक्षात येताच खुद्द मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दखल घेतली आहे. स्वत:हून जनहित याचिका म्हणून हे प्रकरण स्वीकारले आणि अॅड. जेमिनी कासट यांना न्यायालयीन मित्र नियुक्त केले. उच्च न्यायालयाने त्यांना पुढील चार आठवड्यात या प्रकणाची याचिका तयार करून न्यायालयाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

वनविभागााचे कमालीचे दुर्लक्ष वनबालावर हाेते. देखभालीचे ग्रहण लागलेल्या टाॅयट्रेन रुळांवर कमी आणि तिच्या शेडमध्येच जास्त राहत हाेती. त्यामुळे अबालवृद्धांना हिरवळीच्या साैंदर्याचे दर्शन मिळत नव्हते. वनविभागाच्या म्हणण्यानुसार, टाॅय ट्रेनचे जुने रुळ खराब झाले असून, टाॅयट्रेन चालवण्यासाठी देखभालीची आवश्यकता आहे. महत्त्वाचे म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये वनबालाने सेमिनरी हिल्समधील बालाेद्यानातील सफर दीर्घ कालावधीनंतर प्रारंभ केला हाेता. मात्र, हा सार ार काळ चालला नाही. त्यावेळी ट्रेनचे रुळ बदलविण्याचे नियाेजनही झाले हाेते. मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही. शासनाच्या उदासिनतेचा फटका वनबालाला बसला आहे. त्यामुळेच उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत वनबाला पुन्हा रुळावर धावण्याचे संकेत आहेत.
मध्य रेल्वेने केली हाेती वनबालाची देखभाल
गेल्या दाेन वर्षांपूर्वी म्हणजेच 2023 मध्ये ट्रेन सुरू हाेण्यापूर्वी मध्य रेल्वेने ट्रेनची देखभाल देखील केली हाेती. सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील वनबाला स्टेशनची स्वच्छता आणि मजबुतीकरण केले व त्याला एक नवीन रूप देण्यासाठी रंगरंगाेटी केली. दाेन वर्षांपूर्वी टाॅय ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी, चार ट्रायल रन घेण्यात आल्या हाेत्या. यशस्वी ट्रायल रननंतर, मध्य रेल्वेने ट्रॅकवर ट्रेन चालवण्यास मान्यता दिली. ही टाॅयट्रेन 45 वर्षे जुनी असून, 2.5 किमीचा प्रवास करते. डिसेंबर 1978 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ट्रेनला हिरवी झेंडी दाखवली हाेतीत, हे विशेष.