समाज माध्यमावर हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह मजकूर

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
श्रीक्षेत्र माहूर, 
offensive-content-about-hindu-deities : येथील एका युवकाने आपल्या फेसबुक अकाउंटवरून हिंदू देवतांविषयी आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसारित केला. त्यामुळे माहूर शहरातील हिंदू बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून त्याचेवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करा, अशी मागणी हिंदू समाजाचे वतीने 11 नोव्हेंबरला माहूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीतून केली.
 
 
 
kl
 
 
 
माहूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीत, संबंधित युवकाने समाज माध्यमात हिंदू धर्माविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. अशी मानसिकता असलेल्या व्यक्तीवर तत्काळ कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली आहे.
 
 
तक्रारीवर जगदीश वडसकर, अनिल काण्णव, पवन चौहान, विजय आमले, संतोष जोशी, निलेश जैस्वाल, दिलीप आरगुलवार, क्षितिज जयस्वाल, अनुदीप कोरटकर या हिंदू बांधवांच्या स्वाक्षèया आहेत.