Saturn's transit २८ नोव्हेंबर रोजी शनी मीन राशीत थेट होत असून त्यामुळे विपरीत राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनीला न्याय आणि कर्मफल देणारा ग्रह मानले जाते. त्याच्या गतीत होणारा हा बदल काही राशींना विशेष लाभदायक ठरणार आहे. शनीची थेट चाल आणि मीन राशीत निर्माण होणारा विपरीत राजयोग जीवनात नवीन संधी, स्थैर्य आणि सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो.
संग्रहित फोटो
वृषभ राशी
शनीच्या या स्थितीमुळे वृषभ राशीच्या लोकांना अडकलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या गोष्टींना गती मिळेल. करिअरमध्ये स्थैर्य येईल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा दिसू शकते. गुंतवणुकीतूनही चांगला फायदा अपेक्षित आहे.
सिंह राशी
सिंह राशींसाठी हा काळ नशीब उजळवणारा ठरू शकतो. कामातील अडथळे दूर होतील, नवीन भागीदारी आणि व्यवसाय संधी निर्माण होतील. आखण्यात आलेल्या योजना यशस्वी होण्याची शक्यता वाढेल. शनीचा हा बदल त्यांना नव्या ऊर्जा आणि सकारात्मकतेसह पुढे जाण्यास मदत करणार आहे.
मीन राशी
शनि सध्या मीन राशीत भ्रमण करत असल्याने या राशीवर त्याचा परिणाम अधिक प्रभावी राहील. मानसिक तणाव आणि गोंधळ कमी होईल. विचारांना स्पष्टता मिळेल. समाजातील प्रतिष्ठा वाढेल आणि आध्यात्मिक तसेच भौतिक प्रगतीची शक्यता वाढेल. अनेकांना नवीन संधी, मान-सन्मान आणि आत्मविश्वासाची प्राप्ती होऊ शकते.
टीप- वरील बातमी केवळ वाचकांची आवड लक्षात घेऊन देण्यात येत आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी.