पाकिस्तानला धक्का...शाहीन आफ्रिदी आजारी

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
इस्लामाबाद,
Shaheen Afridi sick पाकिस्तान-श्रीलंका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. नियमित एकदिवसीय कर्णधार शाहीन आफ्रिदी आजारी असल्यामुळे सामन्यात सहभागी होऊ शकले नाहीत. यामुळे सलमान अली आघा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारत आहेत. शाहीनच्या अनुपस्थितीमुळे पाकिस्तानला निश्चितच मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, कारण ते सामन्यापूर्वी चांगल्या फॉर्ममध्ये होते.
 
 
शाहीन अफरीदी
 
नाणेफेकीदरम्यान सलमान अली आघाने सांगितले की, "आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे आणि सुरुवात चांगली करायची आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात चांगली सुरुवात नेहमीच महत्वाची असते." शाहीन आफ्रिदीसोबत फहीम अश्रफ देखील उपलब्ध नसल्यामुळे अबरार अहमद आणि वसीम ज्युनियरला संघात स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे दुसरा सामनाही एक दिवस उशिराने सुरु झाला आहे. मालिकेत पाकिस्तान आधीच १-० ने आघाडीवर आहे. आता ते दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करतील. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २९९ धावा केल्या, ज्यामध्ये सलमान अली आघाने १०५ धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेचा संघ २९३ धावांवर बाद झाला आणि पाकिस्तानने हा सामना ६ धावांनी जिंकला. उत्कृष्ट कामगिरीसाठी सलमानला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
 
 
पाकिस्तान
फखर जमान, सॅम अयुब, बाबर आझम, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), सलमान अली आघा (कर्णधार), हुसेन तलत, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, हरिस रौफ, नसीम शाह, अबरार अहमद
श्रीलंका
पथुम निस्सांका, कामिल मिशारा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका (कर्णधार), जानिथ लियानागे, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, प्रमोद मदुशन, दुष्मंथा चामीरा, असिता फर्नांडो