न्याय न मिळाल्याने ‘त्या’ सैनिकाचे पुन्हा बेमुदत उपोषण

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
soldier-on-indefinite-hunger-strike : भारतीय सीमारेषेवर दिवसरात्र जीवाची बाजी लावून देशासाठी लढणाèया येथील सैनिकावर आपल्याच हक्काच्या जागेसाठी पुन्हा एकदा प्राणांतिक संघर्ष करण्याची वेळ आली आहे. न्याय न मिळाल्याने रंजित चव्हाण या सैनिकाचे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
 
 
y14Nov-Sainik
 
गेल्या चार महिन्यांपासून तो शासन, प्रशासन दरबारी कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करूनसुद्धा त्याला न्याय मिळाला नाही. परिणामी 12 नोव्हेंबरपासून त्याने ग्रापं कार्यालय गौळ (खु) समोर उपोषण सुरू केले. रंजित चव्हाण हा पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात कांगसा तहसील मधील पानागड येथे कर्तव्यावर आहे. तालुक्यातील गौळ खुर्द येथील तो रहिवासी असून त्याची येथे वडिलोपार्जित जागा आहे. परंतु या जागेवर गावातील दोन व्यक्तींनी त्याच्या अनुपस्थितीत अनधिकृतपणे कब्जा करून घर बांधले असा त्यांनी दावा केला.
 
 
कर्तव्यावर असताना या संदर्भात ग्रा.पं.ला सर्व दस्तऐवजासह माहिती देऊनही त्यांनी अनधिकृत बांधकाम थांबविले नाही. उलट अतिक्रम धारकानाच मदत केल्याचा त्यांनी आरोप केला. याप्रकरणी 17 जुलै रोजी उपोषण केले असता गटविकास अधिकाèयांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले होते.
 
 
परंतु अजूनही याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यामुळे त्यांनी केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना पत्र व्यवहार करून 12 नोव्हेबर रोजी संध्याकाळी 5 वाजतापासून सैनिकाच्या वर्दीमध्ये उपोषण सुरू केले आहे.