जान्हवीचा राज्यात तिहेरी सुवर्णवेध !

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
नागपूर,
State-level school field competition डेरवण, रत्नागिरी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत श्रीमती दादीबाई देशमुख हिंद मुलींची शाळा, नागपूरची धावपटू जान्हवी हिरुडकर हिने तब्बल तीन सुवर्णपदकांवर नाव कोरले. १९ वर्षाखालील मुलींच्या गटात ३००० मी., १५०० मी. आणि ८०० मी. धावण्यात सर्वांना मागे टाकत तिने सुवर्णहॅटट्रिक साधली.
 

988 
 
 
या कामगिरीमुळे जान्हवीची हरियाणा, भिवाणी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गेल्या वर्षी तिने लखनौमध्ये दोन सुवर्णपदकांसह उत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला होता. State-level school field competition  राज्यस्तरीय स्पर्धांमधील तिच्या सुवर्णपदकांची संख्या आता ९ वर गेली आहे.जान्हवीचे प्रशिक्षक अशपाक शेख तसेच स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी तिचे अभिनंदन करून उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सौजन्य:माया बामनोटे,संपर्क मित्र