उज्ज्वला अंधारे यांना जीवनगौरव पुरस्कार

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Lifetime Achievement Award गीतसौरभ संगीत ॲकेडमीच्या अध्यक्ष, कवयित्री, लेखिका व नाट्यकलावंत उज्ज्वला अंधारे यांना बालाजी सरोज भावकाव्य साहित्य प्रतिष्ठानतर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. हा सन्मान पाचव्या साहित्य संमेलनात लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा येथे आयोजित केला जात असून, आदरणीय डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाईल.
 
Ujjwala Andhare
 
पुरस्काराचे स्वरूप: पुष्पगुच्छ, मेडल, मानाचे महावस्त्र, शेला, मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम ₹११,००० आहे. उज्ज्वला अंधारे यांना यापूर्वी आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला असून, त्या अनेक साहित्यिक संस्थांच्या नामांकित पुरस्कारांच्या मानकरी आहेत. Lifetime Achievement Award त्यांनी महाराणी कैकयीच्या बालपणावर आधारित ‘राजकुमारी प्रियकामा’ या २७ कथाकथन व २१ एकपात्री नाट्यप्रयोग सादर केले आहेत.
सौजन्य: वर्षा किडे कुळकर्णी, संपर्क मित्र