आगामी निवडणुकीत काँग्रेसची वंचितसोबत आघाडी: काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहूल बोंद्रे

    दिनांक :14-Nov-2025
Total Views |
बुलढाणा,
rahul-bondre : राज्यात महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडी मित्रपक्ष एकत्र निवडणूक लढणार असून जागा वाटपाचा तिढा स्थानिक पातळीवर येत्या दोन दिवसात निकाली लागणार आहे. काँग्रेस पक्षासोबत वंचित बहुजन आघाडी एकत्र आली आहे. वरिष्ठ नेत्यांनी वैचारिक दृष्या निवडणूकीत एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने मुंबई नांदेड पाठोपाठ आता सर्वच जिल्हास्थानी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची निवडणूक लढणार असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहूल बोंद्रे यांनी दिली आहे.
 
 
bul
 
दि. १४ नोव्हेंबर रोजी पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पदवीधर आ. धिरज लिंगाडे, वंचित बहुजनचे साहेबराव तायडे, सविता मुंडे, निलेश जाधव, प्रशांत वाघोदे, देवा धुराळे, मिलिंद वानखेडे, काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकास दिलीप जाधव, रसिदखा जमादार उपस्थित होते.
 
 
राहूल बोंद्र यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडीसोबत नगरपरिषद, जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीत एकत्र राहणार आहे. आघाडी सोबत असलेले मित्रपक्ष उबाठा सेना तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट सुद्धा एकत्र निवडणूक लढणार आहे. जागा वाटपामध्ये जिल्ह्यातील ११ नगराध्यक्ष पदाच्या जागांपैकी काँग्रेस पक्षाने चिखली बुलढाणा मलकापूर, नांदूरा या चार जागा मागितल्या आहेत. उर्वरित सिंदखेडराजा देऊळगावराजा, मेहकर, शेगाव जळगाव, खामगाव, लोणार या जागा मित्रपक्ष लढविणार आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीलासुद्धा त्यांची शक्ती पाहून जागा देण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसात हा जागा वाटपाचा तिढा सुटणार असल्याचे त्यांनी आर्वजून सांगितले.