नागपूर,
Pawanar Vinoba Ashram अभय चोरघडे यांच्या सोबत पवनार येथील विनोबा भावे आश्रमाला भेट देण्यात आली. आश्रमाची व्यवस्था पाहणारे गौतम बजाज यांनी अगत्यपूर्वक स्वागत केले. लहानपणी वर्ध्यातील त्याच शाळेत आमचे काही वर्षे शिक्षण झाले होते, ही सुखद आठवणही पुन्हा उजळली. माझे वडील स्वातंत्र्यसैनिक वामन चोरघडे आणि अभयचे वडील ज्ञानसाधू वासुदेव चोरघडे यांचे विनोबाजींशी अतिशय जवळचे संबंध होते. विनोबाजींच्या देहावसानाच्या वेळी आम्ही आश्रमात उपस्थित होतो, ही आठवणही भावूक करत गेली.
साधी राहणी, खादीचे वस्त्र आणि उत्साही प्रकृती असलेल्या गौतमजींनी आश्रमातील प्रत्येक काम स्वयंसेवकच करतात, हे सांगितले. ९२ वर्षांच्या आजीसह सर्वांनी परिसर स्वच्छ, शांत आणि पवित्र राखला आहे. Pawanar Vinoba Ashram विनोबाजींचे साहित्य विक्रीस उपलब्ध होते, त्यातील काही पुस्तके घेण्यात आली. शेवटी गौतमजींचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यांचा ताकाचा आग्रह मानून विनोबाजींच्या समाधीचे दर्शन घेऊन भेट समाधानकारकपणे संपली.
सौजन्य: अभय चोरघडे, संपर्क मित्र