नगराध्यक्ष पदासाठी 3 तर सदस्य पदांसाठी 74 उमेदवारी दाखल

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
अकोला,
Akola Mayor Election अकोला-तीन ते चार वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील तेल्हारा, आकोट, हिवरखेड, बाळापूर, मूर्तिजापूर या नगरपरिषद व बार्शीटाकळी नगरपंचायतीसाठी १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.शुक्रवार १४ नोव्हेंबर पर्यंत सदस्य पदासाठी ७४ तर नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यानुसार पाहिल्या टप्प्यात नगरपरिषद व नगरपंचायतचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली तरी राजकिय पक्षाकडून उमेदवारी बाबत संभ्रम असून बैठकांचे सत्र सुरू आहे.
 
 
Akola Mayor Election
 
 
गतवेळेस प्रमाणे नगराध्यक्ष पद जनतेतून असल्याने राजकीय पक्षांची देखील उमेदवारी देताना कसरत होत आहे.नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणा मध्ये अकोट-नामाप्र महिला बाळापूर - नामाप्र महिला, हिवरखेड - नामाप्र महिला, तेल्हारा -अनुसूचित जाती महिला बार्शीटाकळी- सर्वसाधारण महिला, मूर्तिजापूर - सर्वसाधारण आरक्षण आहे।नामनिर्देशनपत्रची अंतिम मुदत- १७ नोव्हेंबर असून नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबर, अपील नसलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मदुत- २१ नोव्हेंबर २०२५ अपील असलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर राहील.मतदान २ डिसेंबर तर मतमोजणी ३ डिसेंबरला होईल.
  
उमेदवारी दाखल अर्ज अशाप्रकारे
आकोट येथे सदस्य पदासाठी १३ तर नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही.मूर्तिजापूर येथे सदस्यासाठी ६ तर नगराध्यक्ष पदासाठी एक अर्ज आला.बाळापूर येथे सदस्य व नगराध्यक्ष पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही.तेल्हारा येथे सदस्यासाठी तीन तर नगराध्यक्षसाठी एकही अर्ज दाखल नाही.हिवरखेड येथे नगरपरिषद झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत असून याठिकाणी सदस्यासाठी २८ तर नगराध्यक्षसाठी १ अर्ज दाखल झाला आहे.बार्शीटाकळी येथे सदस्यासाठी २४ तर नगराध्यक्ष पदासाठी १ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.