परिवर्तनवादी व्यक्तींचा इतिहास कायम स्मरणात ठेवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
नागपूर,
devendra fadnavis आपला इतिहास विसरल्यामुळेच आपण अनेक वर्षेपर्यंत गुलामीत होतो. त्यामुळे परिवर्तनवादी व्यक्तींचा इतिहास कायम स्मरणात ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उत्तर मार्गावरील अनसूयाबाई काळे स्मृती सदन आणि पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या वर्किंग वूमन अँड गर्ल्स होस्टेलच्या नूतनीकरण झालेल्या वास्तूचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अँम्परसँड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रुस्तम केरावाला, काळे फाऊंडेशन ट्रस्टचे विश्वस्त विलास काळे, एआयडब्ल्यूसीच्या माजी अध्यक्ष शीला काकडे, पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या अध्यक्ष नीलिमा शुक्ला, सचिव कर्णिक, सरिता कौशिक , अनसूया काळे-छाबरानी आदी उपस्थित होत्या.
 

devendra fadnavis 
देशाच्या पहिल्या संसदेत अनसूयाबाई काळे यांनी नागपूरचे प्रतिनिधीत्व केले आहे. महिलांच्या सामाजिक, आर्थिक परिवर्तनाच्या लढ्यातील हक्काचा आवाज म्हणजे अनसूयाबाई होत्या. त्यांचे विचार, पुरोगामी होते. त्यात सुधारणवादाचा विचार होता. आयुष्यात अनेकांच्या प्रेरणा ठरलेल्या अनसूयाबाई या आपल्या समाजाच्या आदर्श आहेत. नागपूर शहराने उत्तुंग व्यक्तिमत्त्वे पाहिली, त्यापैकी अनसूयाबाई एक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. जातीयतेविरोधातील लढ्यासाठी आमदारकीचा राजीनामा देणार्‍या अनसूयाबाई यांनी महिलांच्या उत्थानासाठी, महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी केलेले परिश्रम अनेकांना प्रेरणादायी आहे.
नाटकाच्या सरावाकरिता येत होतो
पूर्व विदर्भ महिला devendra fadnavis परिषदेची ही इमारत मी लहानापासून पाहत आलो आहे. फार पूर्वी सरावाकरिता येथे अनेकवेळा येण्याचा प्रसंग आला होता, अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात सांगितले. अलीकडे इमारतीची अवस्था वाईट झाल्यानंतर आता या इमारतीला नवीन लुक मिळाला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला काळे फाऊंडेशन ट्रस्टचे विश्वस्त विलास काळे यांनी प्रास्ताविकात अनसूया बाईंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपदा कुळकर्णी पंडीत आदींनी परिश्रम