वर्धा,
sachin-pawde : केळी उत्पादक शेतकर्यांसाठी वास्तव खर्चाच्या आधारावर किमान आधारभाव (एमएसपी) देण्यात यावे या मुख्य मागणीसह केळ उत्पादकांना सुविधा देण्यात याव्या या मागणीचे निवेदन शेतकरी नेते डॉ. सचिन पावडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांना देण्यात आले.
विदर्भातील केळी उत्पादक शेतकरी उत्पादन खर्च वाढ, बाजारभावातील अनियमितता, वाहतूक खर्च आणि पिकातील रोग-कीड यामुळे गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे बाजारात किरकोळ दर ५० रुपये किलोपर्यंत असताना शेतकर्यांना फत ४ ते—५ रुपये प्रतिजोड (जाग) दरानेच केळी विकावी लागत आहे. हा प्रचंड दरीचा फरक शेतकर्यांचे आर्थिक नुकसान वाढवणारा असल्याने केळी उत्पादक शेतकर्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली.
यासोबतच केळी पिकाचा वास्तव उत्पादन खर्च लक्षात घेऊन तातडीने एमएसपी जाहीर करण्यात यावे, एमएसपी शेतकर्यांच्या हाती पोहोचेल अशी पारदर्शक आणि प्रभावी खरेदी यंत्रणा उभारण्यात यावी, पोस्ट-हार्वेस्ट व्यवस्थेसाठी मदत, कोल्ड हाऊस, वाहतूक अनुदान आणि प्रक्रिया उद्योगासाठी सहाय्य देण्यात यावे, पिकातील रोग-कीड व बाजारभाव कोसळल्याने झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या. यामुळे केळी शेतकर्यांच्या होत असलेल्या आर्थिक शोषणाला आळा बसेल, अशी अपेक्षा केळी उत्पादक शेतकर्यांचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. सचिन पावडे यांनी व्यत केली.