नागपूर,
Cases registered against RTO Chavan आरटीओ रवींद्र भुयार यांच्याविरुध्द कट रचून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट रचणा-या नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण आणि इतर सहा जणांवर सिताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये विजय चव्हाण यांच्यासह गीता भास्कर शेजवळ, हेमांगिनी बालासाहब पाटील, दीपक अण्णासाहेब पाटील आणि लक्ष्मण प्रल्हाद खाडे यांचा समावेश आहे. परिवहन खात्यातील आरटीओ पदावरील पदोन्नती आणि पदस्थापनेत स्पर्धक असलेल्या भुयार यांच्याविरुद्ध कट रचून तक्रारी देऊन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांना ङ्कक्लिन चिटङ्ख मिळताच त्यांनी पाच जणांविरुद्ध तक्रार दिली होती.

आरटीओ अधिकारी रवींद्र भुयार हे नागपूर शहर आरटीओ कार्यालयात कार्यरत होते. त्यांना हटवण्यासाठी काही अधिकाèयांनी एकत्र येत कट रचला. त्यानुसार भुयार यांच्या विरोधात एका महिला अधिकाèयास चुकीची माहिती देऊन भुयार यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी व विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यास सांगण्यात आले. नागपूरच्या पदस्थापनेला विरोध नको म्हणून भुयारांना अडचणीत आणण्यासाठी विजय चव्हाण यांनी सेवानिवृत्त अधिकारी लक्ष्मण खाडे याची मदत घेऊन आरटीओ नागपूरचा अतिरिक्त कार्यभार मिळवला होता. दरम्यान रविंद्र भुयार यांना नागपूर येथे पदस्थापना मिळू नये म्हणून विजय चव्हाण, लक्ष्मण खाडे यांनी एका महिला अधिका-याला हाताशी धरुन पोलिसांत तक्रार देण्यास भाग पाडले होते. या प्रकरणी पोलिसांना हा गुन्हा खोटा असल्याचे आढळले. त्यामुळे न्यायालयात ब-वर्ग समरी हवाल दाखल करण्यात आला होता.
जानेवारी 2023 मध्ये महिला अधिकाèयाने केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याकरिता आरटीओ अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. त्यामुळे पाटील यांनी विजय चव्हाणांना लाभ व्हावा म्हणून समितीमधील दीपक पाटील यांच्यासोबत रिपोर्ट तयार केला. हा सर्व गैरप्रकार समितीमधील अशासकीय सदस्यांनी उघडकीस आणला होता. या संदर्भात न्यायालयात दाखल विविध प्रकरणात पारित झालेल्या आदेशाप्रमाणे रवींद्र भुयार यांच्या िफर्यादीवरून व सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे विजय चव्हाण, दीपक पाटील, लक्ष्मण खाडे, हेमांगीनी पाटील आणि गीता शेजवळ अशा पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस ठाण्यात प्राप्त तक्रारीवरुन आरटीओ विभागातील पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणी ग्रामीणचे आरटीओ विजय चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.