क्रांतिनायक बिरसा मुंडा जयंती साजरी

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Birsa Munda आदिवासींचे क्रांतिनायक, स्वातंत्र्यसेनानी आणि जल-जंगल-जमीन रक्षणासाठी आजीवन लढा देणारे जननायक भगवान बिरसा मुंडा यांची १५०वी जयंती माजी नगरसेवक दिलीप पनकुले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बळवंत कोहे, देवीदास घोडाम, विजय मसराम, सचिन वैद्य, दिनेश सिंडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Birsa Munda
 
कार्यक्रमात माजी नगरसेवक दिलीप पनकुले यांनी बिरसा मुंडा यांच्या पराक्रमी जीवनकार्याची आणि आदिवासी समाजासाठी केलेल्या संघर्षाची माहिती नागरिकांना दिली. Birsa Munda कुंवारा भिमालपेन सेवा संस्था, अंबिका नगर अजनी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच केक व मिठाईचे वाटप करून बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
 
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन देवीदास घोडाम यांनी केले. Birsa Munda या जयंती सोहळ्यास अश्विनी मते, संगीता घोडाम, माया मसराम, माया आत्राम, मोरेश्वर आत्राम, नरेश चाफले, गजानन चकोले, मच्छिंद्र आवळे, सुरज बोरकर, अजय बागडे यांच्यासह अनेक समाजबांधवांनी सहकार्य केले.
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र