नागपूर,
Chitnavis Cooperative Bank दि. चिटणवीस सहकारी बँक यांच्या भरतवाडा येथील ८ व्या नवीन शाखेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.१९३१ साली स्थापन झालेली ही बँक आज ९५ वर्षे पूर्ण करत असून सातत्याने प्रगतीपथावर आहे, असे प्रतिपादन . नितीन गडकरी तसेच. रविंद्र दुरुगकर यांनी आपल्या भाषणातून केले. बँकेच्या दर्जेदार सेवा, ग्राहकाभिमुख भूमिका व आर्थिक मजबुतीचे विशेष कौतुक करण्यात आले.
या वेळी आमदार कृष्णा खोपडे, विदर्भ बँक असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र दुरुगकर, माजी नगरसेवक बंडु तळवेकर, बँकेचे अध्यक्ष अजय लांबट, Chitnavis Cooperative Bank उपाध्यक्षा देशमुख, संचालक मंडळ, सभासद तसेच जागृत सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य :राजेश हरडे,संपर्क मित्र