चातगाव येथे नवीन पोलिस स्टेशनची निर्मिती

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
गडचिरोली,
police station in chatgaon गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षा व कायदा सुव्यवस्था बळकट करण्यासाठी धानोरा तालुक्यातील पेंढरी कॅम्प कारवाफा अंतर्गत असलेल्या पोलिस मदत केंद्र चातगावला पोलिस स्टेशन म्हणून शासनाची मान्यता मिळाली आहे. याअन्वये नवीन पोलिस स्टेशन चातगावची निर्मिती करण्यात आली असून या भागातील गुन्हेगारी आणि माओवादी कारवायांवर नियंत्रण ठेवण्याकरिता प्रभावीपणे याचा वापर होण्यास मदत होणार आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते 14 नोव्हेंबर रोजी या पोलिस स्टेशनचे उद्घाटन पार पडले.
 
 

chetgao 
 
 
सन 2010 साली चातगाव येथे पोलिस मदत केंद्राची निर्मीती करण्यात आली होती. सद्यस्थितीत पोलिस स्टेशन चातगाव अंतर्गत 26 गावे जोडली जाणार असून त्यामुळे सदर भागातील नागरिकांना तत्काळ मदत सुरक्षा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांसोबत पोलिसांचा संवाद वाढून नागरिकांकडून योग्य सहकार्य मिळून या भागात शांततेचे वातावरण निर्माण होईल. दरम्यान पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पोस्टे चातगाव अंतर्गत सुरक्षा गार्ड (मोर्चा), पोलिस अधिकारी व अंमलदारांचे बॅरेक, एसआरपीएफ अंमलदार बेरेंक इत्यादींना भेट देवून पोलिस स्टेशनच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकारी, अंमलदार यांना मार्गदर्शन करतांना पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, पोलिस मदत केंद्र चातगावचे पोलिस स्टेशनमध्ये रुपांतर झाल्याने नागरिकांना मदत मिळणे, तक्रार नोंदविणे सोपे होणार आहे. सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सिसिटीएनएस, ई-साक्ष व नवीन कायद्यांचा कौशल्याने वापर करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात. तसेच नागरिकांसोबत सामंजस्यपूर्ण वागणूक ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करावे.police station in chatgaon याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पेंढरी कॅम्पचे उपविभागीय पोलिस अधिकारी जगदिश पांडे, पोस्टे चातगावचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक चैतन्य काटकर व इतर अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.