माऊली समूहाचा भक्तिमय आविष्कार

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Mauli group खासदार महोत्सवांतर्गत आयोजित हरिपाठ आणि पाऊल भजन कार्यक्रमात माऊली समूहाने सादर केलेल्या संगीत-नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मनं जिंकली. भक्ती, नृत्य आणि संगीत यांचा दिव्य संगम घडवणाऱ्या या सादरीकरणाने सभागृहात उपस्थित सर्वांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
 
Mauli group
 
कार्यक्रमाचे सुंदर नियोजन माधवी नादरखानी आणि प्राजक्ता लोणारे यांनी केले होते. त्यांनी आणि त्यांच्या समूहाने समर्पक अभिनय, सुंदर नृत्यरचना आणि भावपूर्ण प्रस्तुतीतून विठ्ठलभक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला. कार्यक्रमाची प्रस्तावना आणि निवेदन आर्या विघ्ने यांनी हृदयस्पर्शी शब्दांत सादर केल्याने कार्यक्रमाला आध्यात्मिक प्रारंभ मिळाला. Mauli group सादरीकरणात “गणेश वंदना”, “रखुमाई रखुमाई”, “विठू माऊली” अशा भक्तिगीतांवर सादर झालेल्या नृत्यांनी वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांसह सर्व प्रेक्षकांनी माऊली समूहाच्या या भक्तिरसपूर्ण सादरीकरणाचे मनःपूर्वक कौतुक केले.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र