बुलढाणा,
shankar-kumbhar : बुलढाणा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी (दि.१५) रोजी निवडणूक निरिक्षक शंकर कुंभार यांनी बुलढाणा नगरपरिषदेला भेट दिली. यावेळी त्यांनी नामनिर्देशन, प्रभाग रचनेबाबतची माहिती घेतली. तसेच सुरक्षा कक्ष (स्ट्रांग रुम), मतदान केंद्राची माहिती घेत मतदान केंद्राना भेट दिली. निवडणुकीसंबंधी सुरु असलेल्या कामाकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्माण अधिकारी शरद पाटील, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी आदी कर्मचारी उपस्थित होते.