धक्कादायक खुलासा! प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूची बहीण लेस्बियन?

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
indian-cricketers-sister-is-lesbian : सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये कायमच सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगलेली असते. आता प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू दीपक चहर याची बहीण मालती ‘बिग बॉस १९’ मध्ये दमदार स्पर्धक म्हणून उपस्थित आहे. मालतीच्या आयुष्याशी संबंधित धक्कादायक दावा नुकताच चर्चेत आला आहे. अभिनेत्री कुनिका सदानंदने मालिकेत असा दावा केला की, मालती लेस्बियन आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर आणि मालतीच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

CHAHAR
 
 
या वादाच्या पार्श्वभूमीवर, बिग बॉस शोमध्ये तान्या मित्तलने सांगितले की, मालतीने तिला प्लेटने मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी कुनिका सदानंदने मालतीच्या लैंगिकतेवर प्रश्न उपस्थित केला. कुनिकाच्या दाव्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केले, काहींनी तिच्यावर संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर एक नेटकरी म्हणाला की, “नॅशनल टेलिव्हिजनवर एखाद्याच्या लैंगिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं चुकीचं आहे. कुनिकाला लाज वाटली पाहिजे.”
 
 
 
 
 
त्यानंतर काही युजर्सनी तान्याचा बचाव करत म्हटलं की, तिने यामध्ये काहीही चुकीचं केलेलं नाही आणि भविष्यात तिला लक्ष्य करणे योग्य नाही. दुसऱ्या एका युजरने म्हटलं, “तान्याला दोष देऊ नका; ती यात सहभागी नाही.” या चर्चेने बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये मोठी गदारोळ उडवली आहे.
दरम्यान, बिग बॉसच्या वीकेंड का वारमध्ये सलमान खान ऐवजी रोहित शेट्टी घरातील सदस्यांना वास्तवाची ओळख करून देणार आहेत. नुकत्याच वीकेंड का वारचे प्रोमो व्हिडिओ समोर आले असून, शोमध्ये पुढे काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बिग बॉसच्या घरात घडणारी ही वादग्रस्त घटना आणि त्यावर चाहत्यांची प्रतिक्रिया आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.