लहूजी साळवे जयंती उत्साहात

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Lahuji Salve Jayanti "जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी" हा ध्येयविचार रुजवून क्रांतिकारक घडविणारे आणि फुले दांपत्यांचे गुरू आद्य क्रांतीगुरू लहूजी साळवे यांची २३१ वी जयंती लहुजी साळवे स्मारक ट्रस्टतर्फे अंबाझरी येथील लहुजी साळवे उद्यानात उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक लहानूजी इंगळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष विनायक इंगोले होते. मुख्य अतिथी म्हणून राज्य कर उपायुक्त प्रदीप बोरकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी आणि माजी स्थायी समिती सभापती संदीप जाधव उपस्थित होते.

Lahuji Salve Jayanti
ज्येष्ठ विचारवंत अरविंद डोंगरे आणि साहित्यिक चंद्रकांत वानखेडे यांनी लहूजी साळवे यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. या सोहळ्याला लोकमतचे उपसंपादक नरेश डोंगरे, ट्रस्टचे संस्थापक राजेश खंडारे, महेंद्र प्रधान, किशोर तेलंग, बुधाजी सुरकार, पत्रकार नरेशकुमार चव्हाण, प्रवीण शेंडे, बबन जगधने, डॉ. अशोक कांबळे, महादेव जाधव, भारत डोंगरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. Lahuji Salve Jayanti प्रास्ताविक पद्माकर बावणे यांनी तर संचालन शिवशंकर ताकतोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर जाधव, सचिन इंगोले, रवींद्र खडसे, संजय ठोसर, वैभव इंगोले, सुरेश संतापे, चंदू खडसे, हर्ष इंगोले यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य: शिवशंकर ताकतोडे, संपर्क मित्र