गुप्तधनाच्या नादात १९ लाख गमावले

*सेलू पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
lost-money : तुमच्यावर देवीचा कोप आहे. पूजा करून देतो तसेच घरातील गुप्तधन काढून देतो म्हणत अमृत नाईक यांची तब्बल १९ लाख रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी अमृत नाईक (३०) रा. आकपुरी ता. जि. यवतमाळ यांच्या तक्रारीवरून सेलू पोलिस ठाण्यात लालचंद चव्हाण आणि त्याचा भाऊ रा. तरोळा ता. काटोल जि. नागपूर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 

jk 
 
 
 
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमृत नाईक यांचा विश्वास संपादन करून तुमच्या घरी असलेले गुप्त धन काढून देतो असे म्हणून लालचंद चव्हाण आणि त्याच्या भावाने अमृतच्या वडिलांकडून वारंवार पैसे घेतले. देवीचा कोप असल्याने घरी पुजा करावी लागेल असे सांगून नाईक यांच्या घरात खोदकाम केले. या खोदकामातून एक मडके निघाले. हे मडके लाल कापडात बांधून ठेवण्यास सांगितले. तसेच पुन्हा तीन मडके असून ते काढण्यासाठी पुन्हा पैसे मागितले. त्यामुळे अमृतच्या वडिलांनी शेती गहान ठेवून त्यांना पुन्हा १० लाख रुपये दिले. नाईक यांच्या मनात भीती निर्माण करून वारंवार पैशाची मागणी करीत तब्बल १९ लाख रुपये उकळले. मात्र, आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच नाईक यांनी सेलू पोलिसात तक्रार नोंदविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सेलू पोलिसांनी लालचंद चव्हाण आणि त्याचा भाऊ या दोघांवर गुन्हे दाखल केले.