मविआ अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. महंमद नदीम यांचे नामांकन दाखल

    दिनांक :15-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
mohammad-nadeem : पुसद नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. महंमद नदीम यांनी शनिवारी नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांचेकडे दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीचे नेते माजी विधान परिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गटाचे शरद मैंद, डॉ. अकील मेमन, अनुकूल चव्हाण, शिवसेना उबाठा गटाचे रंगराव काळे, राजू वाकडे, अ‍ॅड. वीरेंद्र राजे यांच्यासह महाविकास आघाडीच्या पक्षांचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 

y15Nov-Nadeem